खाकी वर्दीत दिसली मंदिरा बेदी, नव्या प्रोजेक्टची करतेय तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री मंदिरा बेदी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती नेहमी तिच्या शरीराच्या ठेवणीकडे लक्ष देताना दिसते. अलीकडेच मदिराने काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या मंदिराचे हे फोटो चर्चेत राहिले आहेत. या फोटोमध्ये मंदिराचा एक वेगळा अवतार पाहायला भेटतोय. या फोटोत मंदिराने पोलिसांची वर्दी घातली आहे.

सोशल मीडियावर मंदिराने पोलिसांचा गणवेश परिधान केलेली अनेक फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये गोवा पोलिसांची गाडी मागे उभी असल्याचे दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर असं वाटतय की मंदिरा नवीन प्रोजेक्टसाठी शुटिंग करत आहे. पण अद्याप याबद्दल अधिकृतपणे काहीच माहीत झालं नाही. फोटो शेअर करताना मंदिराने लिहिले- hit me. हे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसंत केली जात आहेत. मंदिराचे लहान केस असल्यानं ती या फोटोत खूप सुंदर दिसत आहे.

मंदिरा वारंवार तिचे वर्कआउट सेशन्स आणि योगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. वयाच्या 48 व्या वर्षीही ती तंदुरुस्त आणि सक्रिय आहे. ती बॉलिवूडमधील सर्वात तंदुरुस्त अभिनेत्रींमध्ये मोजली जाते. छोट्या पडद्यावर शांति, दुश्मन, क्योंकि सास भी कभी बहु थी यासारख्या मालिकांव्यतिरिक्त तिने आयसीसी क्रिकेट विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, इंडियन प्रीमियर लीगमधेही होस्टिंग केलं आहे.

यापूर्वी मंदिरा साहोमध्ये दिसली होती – याअगोदर मंदिरा ‘साहो’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. याशिवाय ‘द ताशकंद फाइल्स’ या चित्रपटातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like