Actress Mandira Bedi | मृत्यूच्या आधी काय घडलं मंदिरा बेदी- राज कौशल यांच्या घरात? संगीतकार सुलेमान मर्चंट यांनी केलं भाष्य

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Actress Mandira Bedi) हिचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल (Director Raj Kaushal) यांचं बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. आता राज यांचा मित्र आणि संगीतकार सुलेमान मर्चंट (musician sulaiman merchant) यांनी ई-टाइम्सला दिलेल्या माहितीत राज यांच्या मृत्यूच्या आधी घरात काय घडलं यावर भाष्य केलं आहे. राज यांच्या छातीत मंगळवारपासूनच दुखत होत. याची कल्पना त्यांनी मंदिरा बेदीला (Actress Mandira Bedi) दिली होती.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सुलेमान म्हणाले, मंगळवारी छातीत दुखू लागल्याने राजने अँटॅसिड टॅब्लेट घेतली. त्यानंतर बुधवारी पहाटे 4 वाजता हार्ट अटॅक येत असल्याचे राजने मंदिराला सांगितले. त्यानंतर मंदिराने तातडीने त्यांचा मित्र आशीष चौधरीला फोन केला आणि ते दोघं राजला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला लागले. दरम्यान राजची शुद्ध हरपली होती. राजला रुग्णालयात आणले. 5-10 मिनिटात त्यांच्या लक्षात आला कि राजची नाडी चालू नव्हती. डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत खूपच उशीर झाला होता. यापूर्वीही राजला हार्ट अटॅक (Heart attack) आला होता. त्यावेळी तो 30-32 वयाचा होता. त्यानंतर तो स्वतःची खूप काळजी घेत होता असे सुलेमान यांनी सांगितले.

मनोरंजन (Entertainment) विश्वात संघर्षाच्या काळापासून सुलेमान आणि राज हे खूप चांगले मित्र होते.
25 वर्षं ते सोबत होते. इतका जुना जिवलग मित्र गमावल्याने सुलेमान यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
कोरोना महामारीच्या काळात राजच्या घरी मी गेलो होतो.
प्यार में कभी-कभी या राजच्या पहिल्या चित्रपटाला मी आणि सलीमनी संगीत दिल होत.
राजच्या नेहमीच मी संपर्कात होतो.
भूमी 2020 या अब्लमचं जेव्हा आम्ही काम सुरु केलं त्यावेळी त्यानी शूटिंगसाठी भाड्याने घेणार असलेल्या बंगल्यात राहण्याची ऑफर आम्हाला दिली होती पण आम्हाला तिथं शूटिंग करता आलं नाही.
अशी सुलेमान यांनी सांगितले.

1999 मध्ये राज आणि मंदिरा यांचा विवाह झाला.
त्यांनी 2011 मध्ये मुलाला जन्म दिला त्यानंतर त्यांनी 4 वर्षाची एक मुलगीही दत्तक घेतली होती.
मृत्युचच्या दोन दिवस अगोदरच राज यांनी सोशल मीडिया वर एक पोस्ट केली होती त्यात ते पार्टी करताना आनंदी दिसत आहेत यामध्ये मंदिरा आणि त्यांचे काही मित्र ही सामील झाले होते.
1981 लेखक म्हणून चित्रपट क्षेत्रातील करिअरला राज यांनी सुरुवात केली होती.
ते मुकुल आनंद यांचे असिस्टंट होते.
त्यांनी नंतर स्वत: ची अडव्हर्टायझिंग आणि प्रॉडक्शन कंपनी (Advertising, production company) सुरू केली आणि 800 जाहिराती डायरेक्ट केल्या.
राजने शेवटची जाहिरात सध्याचा आघाडीचा अभिनेत विकी कौशल (Actor Vicky Kaushal) याच्यासोबत शूट केली होती.

Web Titel :- Actress Mandira Bedi | suleiman merchant revealed night before his death raj kaushal says to his wife mandira bedi that he is having heart attack and not feeling well

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू