अभिनेत्री मानसी नाईकची ‘छेडछाड’ करणार्‍याचा शोध लागला, पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजणगावात एका वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नृत्य करत असताना प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकचा विनयभंग करणारा पोलीसांना सापडला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

अजय अशोक कल्याणकर (वय 23, रा. पर्वती) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मानसी नाईक यांनी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविला होती. झीरोने हा गुन्हा राजंणगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगावात बुधवारी (दि.5) वाढदिवसानिमित्त अभिनेत्री मानसी नाईक यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान साऊंड सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे समन्वयक डॉ. संतोष पोटे आणि साउंड सिस्टीम आँपरेटर अजय स्टेजमागे गेले. त्यावेळी अजयने छेडछाड करीत मानसी यांचा विनयभंग केला. डॉ. पोटेही नाईक यांच्या खूप जवळ उभे राहिले होते. कार्यक्रम संपल्यानंतर डॉ. संतोष पोटे यांनी नाईक यांची मोटार अडवून मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईक यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर रांजणगाव पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानंतर अजय याला आज अटक करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रपुैल्ल कदम, अजित भुजबळ, प्रपुैल्ल भगत, मंगेश थिगळे, किशोर तेलंग, मिंलद देवरे, अमोल नलगे यांच्या पथकाने केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी कुटे करीत आहेत.