ट्रोलरवर भडकली अभिनेत्री मानसी नाईक; म्हणाली – ‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. सतत काहीना काही कारणामुळे ती चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावर सातत्याने ऍक्टिव्हही असते. मात्र, ती आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कारण तिला एका युजरने अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली. त्यावर संताप्त झालेल्या मानसी नाईक हिनेही सडेतोड प्रत्युत्तर दिले.

मानसी ही सोशल मीडियावर असताना तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. एका युजरने काही दिवसांपूर्वी मानसीच्या एका फोटोवर अपशब्द वापरत कमेंट केली होती. त्यानंतर आता मानसी नाईकने त्याला प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, ‘काही दिवसांपूर्वी माझ्या एका फोटोवर यूजरने मी बुधवार पेठेतील आहे, अशी कमेंट केली होती. ती कमेंट पाहून मला हसूही आलं आणि वाईट ही वाटलं. तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? आणि तुम्ही तेथे काय करत होतात? बुधवार पेठ ही जागा ज्या बायका चालवतात त्या बायका स्वत:चं पोट भरण्यासाठी काम करतात. प्रामाणिकपणे काम करतात. मात्र, दुसऱ्यांना अशा भाषेत शिव्या घालून तुम्हाला काय मिळतं?, असा सवाल उपस्थित केला.

मानसी नाईक हिचा सोशल मीडियावर एक चांगला चाहतावर्गही आहे. ते तिला फॉलो करतात. तिचे फोटो, व्हिडिओ किंवा पोस्टला लाईकही करत असतात. पण तिला अनेकदा ट्रोलही केले गेले. तरीही ती अशाप्रकारच्या ट्रोलर्सना योग्य आणि सडेतोड उत्तर देत असते.