खळबळजनक ! ‘खुलता कळी खुलेना’ फेम मयुरी देशमुखच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – खुलता कळी खुलेना या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केली आहे. राहत्या घरी गळफास घेऊन आशुतोषनं त्याचं जीवन संपवलं. आशुतोष एक नवोदीत कलाकार होता. त्याच्या अचानक जाण्यानं सर्वजण हादरले आहेत.

आशुतोष भाकरेच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आशुतोष आणि मयुरी देशमुख यांनी 21 जानेवारी 2016 रोजी लग्न केलं होतं. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं 2017 साली मयुरीनं एका वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात आपली लव स्टोरी सांगितली होती. आशुतोषच्या जाण्यानं इंडस्ट्रीसह कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

आशुतोषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं काही मराठी सिनेमात काम केलं आहे. भाकर, इच्यार ठरला पक्का असे त्यानं काम केलेले काही सिनेमे सांगता येतील.