कोन आहे पॉर्न व्हिडीओ बनवल्याप्रकरणी अटकेत असलेली गहना वशिष्ठ, तिचं ‘खरंखुरं’ नाव काय ?

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ जिने 80 जाहिराती, 7 वेबसीरीज आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, तिला मुंबई पोलिसांनी अश्लील व्हिडिओंचे शूटिंग आणि नंतर मोबाईल अ‍ॅपवर अपलोड केल्याबद्दल अटक केली आहे. छापा टाकल्यानंतर मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने अश्लील रॅकेट चालविल्याबद्दल गेहना वसिष्ठची चौकशी केली व त्यानंतर तिला अटक केली.

गहना वशिष्ठ मूळची छत्तीसगडची असून तिचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिची आई गृहिणी तर वडील शिक्षण विभागात अधिकारी आहेत. चित्रपटांमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव गहना वशिष्ठ असे ठेवले. गहना वशिष्ठने 80 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच मिस एशिया बिकिनी, गहना वशिष्ठ 7 हून अधिक वेब सीरिजमध्ये दिसली आहे, तर तिने डझनभरहून अधिक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. अशा परिस्थितीत अश्लील चित्रपट बनवून अॅपवर अपलोड करून त्यातून पैसे कमविण्याचा आरोप आहे. हा तीच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. अल्ट बालाजीच्या गंदी बात वेब सीरिजमधून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली.

मुंबई पोलिसांच्या आरोपानुसार, गहना वशिष्ठ काही प्रॉडक्शन हाऊसच्या भागीदारीत अ‍ॅडल्ट फिल्मचे शूटिंग करायची आणि अ‍ॅप्स तसेच वेबसाइटवर अपलोड करायची. लोक गहना वशिष्ठचा अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी 2000 हजार रुपये देय देत होते. मुंबईच्या मालाड-मालवणी भागात ग्रीन पार्क नावाच्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. तिच्यासोबत एक महिला छायाचित्रकार आणि एक ग्राफिक डिझायनर देखील अटक करण्यात आली आहे. तेथून हाय डेफिनेशन कॅमेरा, कॅमेरा स्टँड आणि अश्लील व्हिडिओ भरलेल्या मेमरी कार्डही पोलिसांनी जप्त केले आहे.

त्याशिवाय पोलिसांनी तीन बँक खाती जप्त केली असून त्यामध्ये 36 लाख रुपये सापडले असून ही अ‍ॅडल्ट अ‍ॅप्सच्या सहाय्याने मिळविलेली रक्कम असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांना बातमी मिळाली होती की एक टोळी चित्रपटात काम करण्यासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात जाहिराती जारी करत आहे. लोकांना भेटल्यानंतर या लोकांकडून मोठ्या बंगल्यात अश्लील दृश्ये करवून घेत, त्यांना अधिक पैसे देत करारावर स्वाक्षरी करून घ्यायचे आणि नंतर त्यांना पॉर्न चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडत.