‘या’ अभिनेत्रीसोबत काम करण्यासाठी डायरेक्टर आणि प्रोड्युसरसोबत भांडायचे अभिनेते, मृ्त्यूचीही पसरली ‘अफवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ६० आणि ७० च्या दशकात आपल्या अदा आणि सौंदर्याने करोडोंच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री आज आपला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरत होती. त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक पोस्ट सोशलवर व्हायरल झाल्या होत्या. परंतु यानंतर त्यांच्या फॅमिलीने समोर येऊन या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. कुटुंबातील लोक असेही म्हणाले की, अशा खोट्या बातम्या पसरवू नका.

मुमताज यांचे अनेक रंजक किस्से आहेत. काही वाचून तर तु्म्ही हैराण व्हाल. एक प्रसिद्ध अभिनेता प्रोड्युसरसोबत यासाठी भांडला होता की, त्याला मुमताजसोबत काम करायचे होते.

मुमताज यांनी १२ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट १९६९ साली आला जेव्हा त्यांनी राजेश खन्नासोबत ‘दो रास्ते’ सिनेमात आपली दमदार अ‍ॅक्टींग आणि सौंदर्याचा जलवा दाखवला. मुमताज यांच्या या सिनेमानंतर बॉलिवूडमधील प्रत्येक मोठा कलाकार त्यांच्यासोबत काम करू इच्छित होता. मुमताज यांच्या जीवनातील हा काळ असा होता प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर पश्चाताप करत होते.

शशी कपूर यांनी साल १९७० मध्ये आलेला ‘सच्चा झूठा’ हा सिनेमा यासाठी नाकारला होता कारण त्यात मुमताज होत्या. शशी कपूर यांनी नकार दिल्यानंतर राजेश खन्ना यांना या सिनेमात घेण्यात आलं. या सिनेमातील राजेश खन्ना आणि मुमताज यांची जोडी खूप पसंत केली गेली. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर हिट ठरला होता. त्यानंतर शशी कपूर यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. यानंतर त्यांनी मुमताज सोबत पुढील सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.

शशी कपूर यांनी आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी डायरेक्टर आणि प्रोड्युसरसमोर ही अट ठेवली की, ते तेव्हाच सिनेमा साईन करतील जेव्हा सिनेमात त्यांच्यासोबत मुमताज असतील. १९७४ मध्ये आलेल्या ‘चोर मचाए शोर’ या सिनेमा वेळीच हा किस्सा समोर आला. शशी कपूर यांना या सिनेमा ऑफर झाल्यानंतर त्यांनी हा सिनेमा साईन करण्याआधी ही अट ठेवली की, जोपर्यंत मुमताज यांना कास्ट केलं जात नाही तोपर्यंत ते हा सिनेमा साईन करणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त