अभिनेत्री नैना गांगुलीनं शेअर केले पिंक ड्रेसमधील ‘बॅकलेस’ फोटो ! सोशलवर सुरू झाली ‘हॉटनेस’ची चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूड स्टार नैना गांगुली गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती रंगीला सिनेमाच्या न्यू व्हर्जनमुळे चर्चेत आली होती. पुन्हा एकदा ती आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सिनेमातील बोल्ड सीन्समुळे नैनाची खूप चर्चा झाली होती. आता आपल्या फोटोंमुळं ती पुन्हा एकदा चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे.

नैनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. नैना या फोटोंमध्ये कमालीची बोल्ड दिसत आहे. आतापर्यंतचे तिने अनेकदा असे हॉट फोटो शेअर केले आहेत. नैनानं पिंक कलरचा बॅकलेस गाऊन घातला आहे. यात ती आपली बॅक आणि हॉट फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.

नैनानं तिच्या या फोटोत कामालीची मादक पोज दिली आहे. यामुळे तिचा फोटो खूपच बोल्ड दिसत आहे. नैनाच्या या फोटोंची सध्या सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. नैनाचे फोटो काही तासातच प्रचंड व्हायरल झाले आहेत.

नैनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती राम गोपल वर्मांच्या रंगीला सिनेमाच्या नव्या व्हर्जनमध्ये दिसणार आहे. याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे जो खूप गाजला आहे. कारण या सिनेमातील नैना गांगुलीचा अतिशय बोल्ड आणि हॉट अवतार पहायला मिळाला होता. या नव्या व्हर्जनचं नाव आहे ब्युटीफुल(Beautiful- an ode to Rangeela) यात नैनानं अनेक हॉट अदा दाखवल्या. हा तिचा डेब्यू सिनेमा आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like