…म्हणून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकर्‍यांनी सुनावलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसने जगभरात विळखा घातला आहे. यापासून वाचण्यासाठी भारतासह इतर अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सिनेमांचे शूटिंग थांबवून घरी थांबले आहेत. मात्रा, असे असतानाही एक अभिनेत्री लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडून फिरताना दिसत आहे. त्यामुळे नेटकर्‍यांनी तिला सुनावले आहे.

लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड सेलिब्रेटी सतत घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या असा सल्ला देत असताना अभिनेत्री नर्गिस फाखरी वारंवार घराबाहे पडताना दिसत आहे. यासंदर्भात तिने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नर्गिस सध्या अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात आहे. अमेरिकत कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना नर्गिस मात्र बिनाधास्त घराबाहेर फिरताना दिसत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. लॉकडाऊनमध्ये मी हे शहर अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकत असल्याचे तिने म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा सगळीकडे हाहाकार माजला असताना आता हिला घराबाहेर पडण्याची काय गरज असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर नर्गिस तिच्या मित्र मैत्रिणींसोबत व्यायाम करण्यासाठी आणि बाहेर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडते. ऐकून आश्चर्य वाटेल पण नर्गिसने सायकलिंग करतानाचे आणि निसर्ग रम्य वातावरणात व्यायाम करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नर्गिसचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकर्‍यांनी तिला घरी राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. यासोबतच ’सध्याच्या परिस्थितीत असे स्टंट करण्यापेक्षा बाई तू घरीच थांब’ असे नेटिझन्सनी तिला सुनावले आहे. मध्यंतरी घरात भांडी घासत असताना नर्गिसचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय ती टिकटॉकवरही खूप सक्रिय असलेली पहायला मिळत आहे.