अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजपा कार्यकर्त्यांकडून दहीहंडीच्या कार्यक्रमात धक्काबुक्की  

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन 

भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राज्यभर रोष व्यक्त होत असतानाच असाच एक प्रकार बुलढाण्यात घडला आहे. चिखली येथे अभिनेत्री नेहा पेंडसे ही भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर येऊन एकच गर्दी करत नेहाला त्रास होईल असे वर्तन केल्याचे खुद्द तिनेच म्हटले आहे. या कार्यक्रमात गर्दी न करण्याची विनंती करुनही त्यांनी माझे ऐकले नाही. जवळ येऊन सेल्फी काढू नका, लांबून हवे तेवढे फोटो घ्या अशी विनंतीही आपण केली मात्र त्याला कोणी जुमानतच नव्हते, असा आरोप नेहाने केला आहे.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b0f97ef-b18a-11e8-80c3-59882ecc15be’]

या प्रकारानंतर नेहा पेंडसे हिने आयोजकांना खडे बोल सुनावले आणि ती रागारागात कार्यक्रम स्थळावरून निघून गेली. यावेळी भाजपच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी नेहा पेंडसे हिची माफी मागितली. त्यानंतरही ती थांबली नाही. दहीहंडीच्या निमित्ताने गर्दी खेचून आणण्यासाठी राज्यात कायमच बॉलिवूड आणि मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींना आमंत्रण देण्यात येते. तेही प्रसिद्धी आणि पैसा यासाठी ही आमंत्रणे स्वीकारत असतात.

जाहीरात

सध्या भाजपनचे मुंबईतील घाटकोपरचे आमदार राम कदम हे त्यांच्या एका वक्तव्याने अडचणीत आले आहेत. मुलीने विरोध केला तरीही तिला पळवून आणून तुम्हाला देणार, असे वक्तव्य करून त्यांना समस्त जनतेचा रोष ओढावून घेतला आहे. महिलांसंदर्भात बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.

राम कदम,आठ दिवसात उत्तर द्या, नाही तर….