देश वाचवल्याबद्दल आभार, TikTok व्हायरसला पुन्हा परवानगी देऊ नका : अभिनेत्राी निया शर्मा

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे देशवासियांकडून कौतुक केले जात आहे. सरकारने निर्णय जाहीर करताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. यामध्ये सर्वसामान्यांसह सेलिब्रेटींचाही समावेश होता. अभिनेत्री निया शर्मानेही ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना देश वाचवल्याबद्दल आभार मानले आहेत.

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सरकारच्या निर्णयाचे अभिनेत्री निया शर्माने स्वागत केले आहे. टिकटॉक व्हायरसला पुन्हा परवानगी देऊ नका अशी मागणी तिने सरकारकडे केली आहे.