‘No Kiss Girl’ नावाने फेमस झाली हिंदी चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री; असं होतं कारण?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी तिच्या भूमिकेमुळे अनेकांच्या लक्षात असेल. निम्मीचा जन्म 18 फेब्रुवारी, 1933 मध्ये झाला होता. निम्मीने एकापेक्षा एक चित्रपटात अभिनय केला. ती तिच्या काळातील उत्तम अभिनेत्रींपैकी एक होती. निम्मी अर्थात नवाब बानो. नवाब बानो हिचं निम्मी हे नाव चित्रपट निर्माता राज कपूर यांनी दिले होते. निम्मी हिला ‘No Kiss Girl’म्हणूनही ओळखले जाते.

1952 मध्ये चित्रपट ‘आन’च्या लंडन प्रीमियरमध्ये हॉलिवूडच्या लेजेंड्री ऍक्टर Errol Flynn ने त्यांच्या हाताला Kiss करण्याचा प्रयत्न केला होता. पण निम्मीने हात मागे घेत म्हटले, की ‘भारतीय मुली Kiss चा स्वीकार करू शकत नाही’. तेव्हापासून निम्मी बॉलिवूडची ‘No Kiss Girl’म्हणून प्रसिद्ध झाली.

‘या’ चित्रपटांत निम्मीने केलाय अभिनय

राज कपूर यांनी निम्मीला चित्रपट ‘अंदाज’च्या सेटवर स्पॉट केले होते आणि 1949 ची फिल्म ‘बरसात’मध्ये सेकंड लीड रोलसाठी साईन केले होते. ‘बरसात’च्या यशानंतर आन, उडन खटोला, भाई-भाई, कुंदन, मेरे महबूब, दीदार, दाग, बसंत बहार या चित्रपटात अभिनय करून निम्मी प्रसिद्ध झाली. 1949 पासून 1965 पर्यंत ते चित्रपटात सक्रीय राहिली. 16 वर्षाची असताना तिने अ‍ॅक्टिंग करिअरला सुरुवात केली.

राज कपूर, देवानंद यांच्यासह इतर अभिनेत्यांसोबत काम

नर्गिस, मधुबाला, सुरैया, गीता बाली, मीना कुमारी, राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार या अभिनेत्यांसोबत निम्मीने काम केले होते. निम्मी हिला हॉलिवूडच्या चित्रपटाची ऑफरही आली होती. मात्र, तिने त्यास नकार दिला होता.