भाजपचा मनसुबा उधळण्यासाठी ममतांचा नवा डाव 

कोलकता : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता सर्वच पक्षांमध्ये उमेदवार जाहीर करण्याची लगबग सुरु आहे . विरोधी पक्षाला टक्कर देण्यासाठी तगडे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभे करण्याकडे पक्षश्रेष्ठींचा कल आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी देखील अशीच काहीशी खेळी वापरली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी टॉलिवूडची हॉट अभिनेत्री नुसरत जहाँ हिला मैदानात उतरवले आहे.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेमुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. परंतु आता ही लाट ओसरल्याने भाजपला युपीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या मानसुब्यावर पाणी फेरण्यासाठी ममतांनी बशीरघाट क्षेत्रातून अभिनेत्री नुसरतला तिकीट दिले आहे. बशीरघाटमध्ये भाजपचा विजय पक्का मानला जात आहे , परंतु आता नुसरत मैदानात उतरल्याने तरुण आणि अल्पसंख्यांकीची मतं आपल्याकडे वळवण्याचा ममतांनी डाव खेळला असल्याने येथे काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

कोण आहे नुसरत जहाँ – बंगली चित्रपट सृष्टीमधील नुसरत जहाँ लोकप्रीय चेहरा आहे . आपल्या छोट्याशा कारकीर्दीमध्ये तिने अनेक बड्या स्टारसोबत काम केले आहे . 2001 मध्ये तिने चित्रपटनगरीमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर तिने ‘बोलो दुर्गा माई की’, ‘हर हर ब्‍योमकेश’ आणि ‘जमाई 420’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. राज्य सरकारच्या अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये तिने सहभाग घेतला होता. दरम्यान , पार्क स्‍ट्रीट बलात्कार कांडामध्ये नुसरत जहाँचे नाव चर्चेत आले होते . बलात्कार कांडातील मुख्य आरोपी कादर खान याच्यासोबत तिचे संबंध होते . हे दोघे लग्नही करणार होते. या प्रकरणी पोलिसांनी नुसरत जहाँ हिची चौकशीही केली होती.