Actress Parineeti Chopra | परिणीती चोप्राने पापराझींना फोटो काढण्यास दिला नकार; खासदाराशी लग्न होणार म्हणून करतीये नखरे, नेटकऱ्यांच्या कमेंट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actress Parineeti Chopra) ही आता चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री परिणीतीने काही दिवसांपूर्वी राजकारणी असलेले आपचे खासदार राघव चड्ढासोबत (MP Raghav Chadha) साखरपुडा केला. त्यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या नंतर त्यांनी आपले नाते जाहीर करुन साखरपुडा केला .(Parineeti Chopra Engagement) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti And Raghav) यामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. पण आता तिचे नखरे वाढले असल्याची तक्रार पापराझी कडून केली जात आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actress Parineeti Chopra) ही मुंबईतील एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तिथे तिची झलक पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी पापराझी (Bollywood Paparazzi) एकत्र जमले होते. मात्र अभिनेत्री परिणीतीने पापराझींसमोर पोझ देण्यास नकार दिला. पापराझी दिसताच अभिनेत्री परिणीती चिडलेली दिसून आली. (Parineeti Chopra VS Paparazzi) त्यांना बघताच फोटो काढू नका असे तिने सांगितले आणि पाठमोरी उभी राहिली. त्यानंतर परिणीती चोप्राची टीम पापराझींना फोटो काढू नका सांगू लागले. त्यानंतर ती तिथून तडक बाहेर निघून गेली.

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actress Parineeti Chopra) यावेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल (Parineeti Chopra Trolling) करण्यात येत आहे. राजकारण्याशी लग्न करणार म्हणून ती आता नखरे करत आहे अशा कमेंट नेटकरी करत आहे. युजर्सला परिणीतीचे हे वागणे पटलेले नसून एकाने कमेंट केली आहे की लग्नाआधीच हिचे नखरे सुरु झाले तर दुसऱ्याने लिहिले आहे आता का एवढा ॲटिट्युड दाखवत आहेस.

Web Title :  Actress Parineeti Chopra | parineeti chopra trolled for refusing to get clicked users says neta ki biwi hone wali hai nakhre aur badh gaye hai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा