राजकुमार रावच्या सल्ल्यावर ही अभिनेत्री पडली पंग्यातून बाहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आता हा पंगा नेमका आहे तरी काय आणि हा पंगा घेतलाय तरी कोणत्या अभिनेत्रीने ? ऐकून थोड आश्र्चर्य वाटल ना…पण, हा पंगा भांडणाना मधला नसून अश्विनी अय्यर तिवारीचा येणारा चित्रपट आहे आणि ह्या पंग्यातून बाहेर पडलीये अभिनेत्री पत्रलेखा.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’beee9915-bc0b-11e8-afd1-4d2473b3183b’]

अभिनेत्री पत्रलेखा हिने अश्विनी अय्यर तिवारीच्या ‘पंगा’या चित्रपटासाठी अखेरच्या क्षणी नकार दिला आहे. हा चित्रपट पत्रलेखाने का नाकारावा, याची बरीच चर्चा झाली होती. पण आता यामागचे कारण समोर आल्याचे समजतयं, हा चित्रपट करण्यास नकार दिण्याचे कारण आहे राजकुमार राव. होय, राजकुमार राव !

राजकुमार राव आणि पत्रलेखा दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनमध्ये आहेत. . साहजिकचं, कुठलाही चित्रपट करायचा म्हटल्यावर राजकुमारचे मत पत्रलेखासाठी महत्त्वाचे असणारचं. पत्रलेखाला पंगाची स्क्रीप्ट आवडली होती व तिने या चित्रपटासाठी होकार ही दिला होता. पण, शेवटीच्या क्षणी राजकुमार रावच्या सांगण्यावर तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला.

भारतीय रूपया घसरला…आणि थेट परदेशात त्यांच्या पोटाला बसला चिमटा

अश्विनी अय्यर तिवारीच्या पंग्यात कंगना राष्ट्रीय स्तरावरच्या महिला कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना आपल्या चित्रपटात कुणालाच हावी होऊ देत नाही. आधी ही कंगनाने तनू वेडस मनू, क्वीन, फॅशन सारख्या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा लोहा मनवला आहे. तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटाचा सर्व लक्ष आपल्यावर केंद्रीत करते. पत्रलेखा सध्या आपल्या करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. अशा स्थितीत कंगणाची फिमेल को-स्टार बनल्यावर पत्रलेखाकडे काहीच उरणार नाही. त्यामुळेच चित्रपटात काम न करण्याचा सल्ला राजकुमारने आपल्या गर्लफ्रेंडला दिला.

लालबागच्या राजाचे नियंत्रण सरकारच्या हाती ?

लवकरच कंगना व राजकुमार रावचा ‘मेंटल है क्या’ हा चित्रपटही झळकणार आहे. . मग काय, राजकुमारचा (कदाचित अनुभवाचे बोल) हा सल्ला ऐकल्यानंतर पत्रलेखाने कंगनासोबत ‘पंगा’ न घेणेच योग्य समजले. पत्रलेखाने नकार दिल्यावर या चित्रपटात तिच्या जागी रिचा चड्ढाची वर्णी लागली.

कंगनाशिवाय या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अलीकडे अश्विनीने या चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती देणारा व्हिडिओ जारी केला होता. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार असून आता त्यापूर्वी ‘पंगा’च्या सेटवर काय काय घडामोडी घडतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ac41e84-bc0c-11e8-8b16-effea97703b6′]

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like