CAA-NRC ला पूजा भटचा विरोध, म्हणाली- ‘माझ्या घराची फाळणी होईल अशा गोष्टीला माझा पाठिंबा नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरातील अनेक ठिकाणी CAA आणि NRCला विरोध होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांसून याविरोधात आंदोलनं होत आहेत. अशात आता अभिनेत्री पूजा भटनंही या आंदोलंनांना आता पाठिंबा दिला आहे. एका प्रेस कॉन्फरंसमध्ये बोलताना तिनं आपली भूमिका मांडली.

दक्षिण मुंबईतील CAA-NRC विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या कार्यक्रमात बोलताना पूजा भट म्हणाली, “तुम्ही म्हणता ना भारत माता की जय बोला. आमच्यातील प्रत्येक महिलेत एक आई दडलेली आहे. तुम्ही त्या आईला जागवलं आहे. भारत सरकारचे आभार की त्यांनी सर्वांनी आम्हाला झोपेतून जागं केलं आहे. आज पूर्ण देश याच्या विरोधात आहे. युरोपियन संघ बोलतोय हे सर्व खोटे आहेत का ?”

CAA-NRC माझ्या घराची फाळणी

CAA-NRC विरोधातील आंदोलाना पूजा भटनं समर्थन दर्शवलं. पूजा म्हणाली, “त्यांनी आपल्याला जागं होण्याचा संदेश दिला आहे. मी CAA-NRC ला अजिबात पाठिंबा देत नाही. त्याच्यामुळे माझ्या घराची फाळणी होऊ शकते. जी गोष्ट माझ्या घराची वाटणी करू शकते त्या गोष्टीला मी कधीच पाठिंबा देत नाही.”

पुढे बोलताना पूजा म्हणाली, “असं म्हटलं जातं की, बॉलिवूडमध्ये फक्त काहील लोकच बोलतात. मला माहिती आहे की, सर्वजण बोलत नाहीत. सगळे घाबरतात. नेत्यांनो आमचं महणणं ऐका, शाहीन बाग ते लखनऊ पर्यंत आंदोलन करणाऱ्या महिलांचं बोलणं ऐका. या सरकारला माहिती आहे की, त्यांचे ऑडियन्स कोण आहेत. सोशल मीडियावरील लोकांना विनंती आहे, घरात आग लागली आहे त्यात आणखी पेट्रोल ओतू नका. जे विद्यार्थी याच्या विरोधात प्रदर्शन करत आहेत त्यावरून समजत आहे की, आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.”

फेसबुक पेज लाईक करा

You might also like