प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेला ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ प्रकरणी अटक ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री पूजा हेगडे ही आता वेगळ्याच विषयाला घेऊन सोशल मिडियाच्या चर्चेत आली आहे. नुकतीच पूजाविषयी एक आश्चर्यचकीत गोष्ट समजत आहे. तिला चक्क पोलिसांनी मद्य अवस्थेत पकडल्याचे समजत आहे.

अभिनेत्री पूजा हेगडेचा ‘महर्षी’हा दक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनापूर्वी हैद्राबादमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पूजाने कार्यक्रमातून हॉटेलकडे जाताना मद्य अवस्थेत कार चालवली आणि पोलिंसानी तिला पडकले. अशी माहिती सोशल मिडियवर व्हायरल झाली होती.

तेथील मॅनेजरने सांगितले की, ‘कार्यक्रम संपल्यानंतर पूजाला विमानतळावर जाण्यासाठी चित्रपट टिमकडून तिच्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. आणि महत्वाचे म्हणजे अनोळखी शहरात ड्राइव्हिंग करण्याचे धैर्य पूजा करु शकत नाही. या बातमीत तथ्य असते तर तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार नक्कीच असेल. पण असे काही झाले नाही.’

पुढे ते म्हणाले की, अभिनेत्री पूजा हेगडेच्या विरोधात हे वृत्त बनावट आहे. खोटी बातमी छापणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

पूजाने बऱ्याच दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. पूजाने आशुतोष गोवरिकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदरो’या चित्रपटात ह्रतिक रोशनसोबत भूमिका साकारली होती.