मराठमोळी पूजा सावंत दिसणार ‘या’ हिंदी चित्रपटात

मुंबई : वृत्तसंस्था – पूजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर पोस्टर बॉईज, नीळकंठ मास्तर, दगडी चाळ, लपाछपी अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकल्या नंतर.आता ही मराठमोळी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अभिनेता विद्युत जामवालसोबत ‘जंगली’ सिनेमातून पूजा हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री करत आहे.’जंगली’ चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. मात्र त्यात पूजाची झलक दिसली नाही त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

हा एका वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यावरील चित्रपट आहे. प्रवासामध्ये हत्तींची शिकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या विरोधात संघर्ष करणारा नायक म्हणून विद्युत दिसणार आहे. हा चित्रपट ५ एप्रिलला रिलीज होणार आहे

अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले ,अनुजा गोखले, सोनाली कुलकर्णी,जितेंद्र जोशी, यांसारख्या मराठी कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर पूजा सावंत ही या चित्रपटातून बॉलिवूड एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे.