Actress Prema Kiran Passed Away | ‘धुमधुडाका’, ‘दे दणादण’ सह अनेक मराठी चित्रपट गाजविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे 61 व्या वर्षी निधन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Actress Prema Kiran Passed Away | धुमधुडाका, दे दणादण यासह अनेक मराठी चित्रपट गाजविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज (रविवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या. (Actress Prema Kiran Passed Away)

 

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरच्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. ९० च्या दशकात प्रेमा किरण यांच्या नायिकेच्या भुमिका गाजल्या होत्या.

 

प्रेमा किरण यांनी मराठी बरोबरच हिंदी व भोजपूरी चित्रपटांमध्येही काम केले. त्या मुळच्या पुण्याच्या (Pune) होत्या.

 

१९८५ मध्ये आलेल्या धुमधडाका हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्वाचा टप्पा ठरला आहे.
धुमधडाकामध्ये प्रेमा किरण यांची भूमिका गाजली होती. इरसाल कार्टी (१९८७), पागलपन (२००१),
अर्जुन देवा (२००१), कुंकू झाले वैरी (२००५), लग्नाची वरात लंडनच्या घरात (२००९) हे प्रेमा किरण यांचे चित्रपट गाजले.
त्यांनी विविध चित्रपट, मालिका, कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा व दोन हजारापेक्षा जास्त नाटकाचे प्रयोग त्यांनी केले.

 

Web Title :- Actress Prema Kiran Passed Away | marathi actress prema kiran dies at 61 in mumbai due to heart attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा