Actress Priyanka Chopra | मिथुनच्या ‘या’ गाण्यावर डान्स करताना दिसली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा, व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन – ग्लोबल आयकॉन बनलेली प्रियांका चोप्रा म्हणजेच आपली बॉलिवूडची देसी गर्ल (Desi Girl of Bollywood Priyanka Chopra) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रियांका चोप्रा सोशल मिडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे जगभरात मोठ्या प्रमाणात फॅन फॉलॉइंग्स आहेत. दरम्यान आता अलीकडे, अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Actress Priyanka Chopra) उत्तर प्रदेशातील काही भागांचा दौरा करण्यासाठी आली आहे. इतकच नाही तर , ती तिच्या केसांची निगा राखण्यासाठी ब्रँडचा प्रचार करण्यासाठी युनिसेफची सदिच्छा दूत म्हणून भारतात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे तब्ब्ल तीन वर्षांनी प्रियांका भारतात आली आहे. आता या दौऱ्यादरम्यान आणि कामानिमित्त ती खुप व्यस्त होती. तरीदेखील तीने स्वत:साठीही वेळ काढला होता. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Actress Priyanka Chopra) इन्फ्लुएंसर रुही दोसानीसोबत बॉलीवूडचे दिग्गज मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty Song) यांच्या ‘ये रात में जो मजा है’ (‘Yeh Raat Mein Jo Maja Hai’ Song) या हिट गाण्यावर नाचताना दिसली आहे.

 

दरम्यान प्रियांका चोप्राचा हा डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Actress Priyanka Chopra social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रुहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ (Actress Priyanka Chopra Dance Video) शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रियांका बाथिंग सूट घालून गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत राहून माझी काळजी घेत आहे. बरं, तुला घरी आराम करायचा आहे की बाहेर जायचय?’ दरम्यान या व्हिडिओची सुरुवात रुही ‘प्रियांका, जाना है क्या आज रात को’ म्हणत होते. ज्यावर प्रियांकाने उत्तर दिले, ‘ठीक आहे, आम्ही कॅबची वाट पाहत आहोत, आणि कॅब आत्ताच रद्द झाली आहे, मग दुसरी कॅब शोधावी लागेल.’ यानंतर दोघेही ‘ये रात में जो मजा है’च्या धूनवर बाथ रॉबमध्ये डान्स करतात आणि खूप मजा करतात.

तसेच येत्या काही दिवसांत प्रियांका वर्क फ्रंटवर अनेक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
प्रियांकाकडे ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ आणि ‘सिटाडेल’ या मालिकेसारखे आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहेत.
ज्यात ती काम करताना दिसणार आहे. तसेच रुसो ब्रदर्स निर्मित, ‘सिटाडेल’ OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.
यासोबतच प्रियांकाकडे ‘जी ले जरा’ हा बॉलिवूड चित्रपटही आहे,
ज्यामध्ये तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ काम करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तरने केले आहे.

 

Web Title :- Actress Priyanka Chopra | priyanka chopra dances on mithun chakraborty song ye raat mein jo maza hai in a bathrobe video getting viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Salaam Venky Movie| ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज , अभिनय आणि संवाद जिंकतील तुमचे मन

Jitendra Awhad | ‘असल्या आरोपांतून घरे उद्धवस्त होतील, त्यापेक्षा राजकारणात न राहिलेले बरे’ – जितेंद्र आव्हाड

Radhakrishna Vikhe Patil | राज ठाकरेंच्या भविष्यवाणीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…