रम्या कृष्णन यांच्याविषयी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटांतून प्रत्येक कलाकाराने अप्रतिम भूमिका साकारून आपली छाप सोडली आहे. या चित्रपटातील शिवगामी देवीची भूमिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली होती. शिवगामी ही लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रम्या कृष्णन यांचा जन्म १५ सप्टेंबर १९७० रोजी चेन्नई येथे झाला.केवळ १३ वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये २०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस रम्या कृष्णन यांनी दक्षिणात्य चित्रपटात काम केले. दाक्षिणात्य चित्रपटामध्ये लोकप्रियता मिळविल्यानंतर रम्या यांनी बॉलिवूडकडे वाटचाल केली. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टित दयावान चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या भूमिका होत्या. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या बडे मिया , छोटे मिया या चित्रपटात अमिताभ आणि गोविंदा यांच्यासोबत रम्या कृष्णन यांनी काम केले आहे .१२ जून २००३ मध्ये तेलगु दिग्दर्शक कृष्णा वामसी यांच्याशी त्यांनी विवाह केला.

[amazon_link asins=’B07DYRP5YD,B076PGZNRC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80c2be92-b8e8-11e8-9053-d5b40476380e’]

२०१५ मध्ये आलेला बाहुबली चित्रपट हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. यातील शिवगामीच्या भूमिकेला भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रियता मिळाली . या चित्रपटामध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असून आजही त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. जस्ट फॉर वुमन’मासिकाच्या मुखपृष्ठावर त्या झळकल्या आहेत.रम्या कृष्णन यांना आतापर्यंत चार फिल्मफेअर अवॉर्डदेखील मिळाले आहे.

सैफ अली खान, सोनाली बेंद्रेच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे