‘बिग बॉस’ फेम रश्मीचा घटस्फोटाबाबत खुलासा, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –    प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम रश्मी देसाई अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. याहीवेळी ती खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रश्मीने तिच्या घटस्फोटाबाबत खुलासा केला. तिने या घटस्फोटासाठी नंदीशचं वर्तन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. ”नंदीश हा अत्यंत विचित्र प्रवृत्तीचा माणुस आहे. तो वरकरणी खूप शांत आणि सरळ मार्गाने चालणारा माणुस वाटतो. पण तो माझा गैरसमज होता. आमच्या नात्यात समानतेचा दर्जा नव्हता. तो अनेकदा मला अपमानास्पद वागणूक द्यायचा. मी हे नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण हे नातं टिकू शकलं नाही. शेवटी सतत होणाऱ्या मतभेदांना वैतागून मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटामुळे मी काही काळ नैराश्येत देखील होते.

रश्मीने ‘उतरन’ या मालिकेतील सहकलाकार नंदीशसोबत लग्न केलं होतं. परंतु त्यांचं नातं दिर्घ काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर तीन वर्षातच रश्मीने नंदीशला घटस्फोट दिला.