Actress Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदानाला बसला लाखोंचा गंडा; जवळच्या व्यक्तीने फसवले

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणाच्या सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री म्हणजेच रश्मिका मंदाना (Actress Rashmika Mandanna) हिची लाखोंची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची ओळख आता भारताची क्रश अशी झाली असून तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मात्र तिच्या मॅनेजर कडूनच तिची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. रश्मिकाला मॅनेजरने 80 लाखांचा गंडा घातला आहे. (Actress Rashmika Mandanna)

 

 

सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिकाला तिची फसवणुक (Fraud) झाल्याचे लक्षात येता तिने मॅनेजरला कामावरुन तात्काळ काढून टाकले आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून, एका वृत्तवाहिनीनुसार तिच्या जवळाच्या व्यक्तीकडून तिची फसवणूक झाली आहे. फसवणूक केलेली ही मॅनेजर अनेक दिवसांपासून रश्मिकाचे काम सांभाळत आहे. मात्र ती रश्मिकाच्या अपरोक्ष तिचे पैसे लपून चोरत असल्याची धक्कादायक गोष्ट ही अभिनेत्री रश्मिकाच्या लक्षात आल्याने तिला देखील धक्का बसला आहे. जवळच्या व्यक्तीकडून झालेल्या या घटनेबद्दल रश्मिकाने काहीही आवाज उठवलेला नाही.

 

 

रश्मिकाने (Actress Rashmika Mandanna) 2022 साली गुडबाय (Goodbye) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये (Bollywood) पदार्पण केले.
लवकरच तिचा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत अनिमल चित्रपट येणार आहे. येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
तसेच रश्मिका ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) या सिनेमामध्ये झळकणार असून
यामध्ये ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) सोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

 

 

 

Web Title :  Actress Rashmika Mandanna | rashmika mandanna manager cheated her for
rs 80 lakhs soon to be seen in animal movie with ranbir kapoor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा