‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री रसिका सुनील हिला आपण सर्वजण ओळखतो. माझ्या नवऱ्यची बायकोध्ये तिनं शनायाची भूमिका साकारली आहे. रसिका नेहमीच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर येत असते. तिचा मॉडर्न अंदाज चाहत्यांनाही खूप भावत असतो. नेहमीच बोल्ड दिसणारी रसिका आपल्या लुकमुळे चर्चेत आली आहे. तुम्हाला वाटत असेल तिनं एखादा बोल्ड किंवा सेक्सी लुक केला आहे. परंतु असे काही नाही. यावेळी तिचा काही वेगळाच अंदाज समोर आला आहे ज्याची सोशलवर चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B4IMharnj8_/

रसिकाचा एक फोटो समोर आला आहे ज्यात ती पारंपरिक लुकमध्ये दिसत आहे. रसिकानं साडी नेसली आहे ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. नाकात नथ कपाळावर टिकली असा शृंगार तिनं केला आहे ज्यात ती खूप मोहक आणि सुंदर दिसत आहे. रसिकानं दिलेली पोज तर आणखीच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सध्या रसिकाचा हा साडीतील लुक खूप व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B3_u6vfHhRI/

रसिका सध्या अमेरिकेत आहे. सोशलवरून ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकतंच तिनं स्कुबा डायविंगचं प्रशिक्षण घेतलं आहे. तिला यासाठी प्रमाणपत्रही मिळालं आहे. तिनं स्वत: इंस्टाग्रामवरून फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती. यानंतर आता ती व्रेक डायविंग आणि नाईट डायविंगचं प्रशिक्षण घेणार आहे असंही ती म्हणाली.

https://www.instagram.com/p/ByUagW4HC8l/

रसिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर छोट्या पडद्यावर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ती काम करत होती. यात तिनं शनायाची भूमिका साकारली होती. यात तिचा मॉडर्न आणि निगेटीव्ह रोल होता. या रोलनं तिला खूप लोकप्रियता मिळाली. सध्या तिनं मालिका सोडली असून ती अमेरिकेला गेली आहे. तिथं ती शिक्षण घेत आहे आणि तिच्या आवडीच्या इतरही गोष्टी करत आहे.

https://www.instagram.com/p/B333HgDHzl5/

https://www.instagram.com/p/B3rmATrndPH/

https://www.instagram.com/p/B3cESTMnrof/

https://www.instagram.com/p/B3WNezMHsff/

https://www.instagram.com/p/B05d2m6HJx9/