Actress Rasika Sunil | अभिनेत्री रसिका सुनील स्पष्टच बोलली; बोल्डनेस हा पाहणाऱ्या व्यक्तीच्या नजरेवर…!

पोलीसनामा ऑनलाइन – Actress Rasika Sunil | छोट्या पड्द्यावरील हिट मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधून अभिनेत्री रसिका सुनील (Actress Rasika Sunil) ही महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. तिची शनया ही भूमिका खूपच गाजली होती. शनयाचा बिंधास्त आणि बोल्ड अंदाज प्रेक्षकांना खूप भावला होता. रियल लाईफमध्ये अभिनेत्री रसिका ही तितकीच जबरदस्त बोल्ड राहत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते आणि अनेक फोटो शेअर करत असते.

Advt.

रसिका लवकरच ‘फकाट’ या चित्रपटात (Fakat Movie) दिसणार आहे. रसिका ‘Diet लग्न’ (Diet Lagna) या नव्या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रंगभूमीवर परतणार आहे. विजय केंकरे दिग्दर्शित (Director Vijay Kenkare) डाईट लग्न या नाटकात रसिका सोबत अभिनेता सिध्दार्थ बोडके (Siddharth Bodke) आणि वैष्णवी आर. पी. (Vaishnavi R. P.) हे कलाकार मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या नाटकाचे जोरदार प्रमोशन सुरु असून या दरम्यान रसिकाने एका वृत्तीवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला बोल्डनेस् बद्दल प्रश्न विचारण्यात आले त्याची तिने बिंधास्त उत्तर दिली आहेत. या मुलाखतीमध्ये तिने तिचे मनोरंजन क्षेत्रातील अनुभव सांगितले आहेत.

या मुलाखती दरम्यान अभिनेत्री रसिका सुनीलला तिच्या बोल्डनेसबद्दल आणि इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रसिकाने दिलेल्या उत्तराने तिला ट्रोल करणाऱ्या लोकांची तोंड तिने बंद केली आहेत.
प्रश्नाचे उत्तर देताना रसिका म्हणाली की, “मला असं वाटतं की माझे विचार हे अधिक बोल्ड आहेत.
इतरांच्या आयुष्याबद्दल किंवा घडामोडींबद्दल मी कधीच भाष्य करत नाही किंवा त्यात लुडबुड तर अजिबात करत नाही.
कपड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बोल्डनेस हा पाहणाऱ्या व्यक्तीच्या नजरेवर अवलंबून असतो.
कपड्यांनी बोल्ड असणं हा मुद्दा मला न पटणाराच आहे.”

तसेच रसिकाने (Actress Rasika Sunil) तिच्या फेवरेट आउटफिटबद्दल मुलाखतीमध्ये सांगितले.
कपड्यांमध्ये रसिकाला सर्वांत जास्त साडी परिधान करायला आवडते असे तिने कबुल केले.
ती म्हणाले की, “लग्नानंतर खासकरून मला साडी हा पेहराव प्रचंड आवडला, आणि साडी नेसण्यातही वेगळीच
मजा आहे.” येत्या ९ जून रोजी पासून रसिका सुनीलचे ‘Diet लग्न’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये (Shivaji Mandir Dadar) रंगणार आहे.

Web Title :   Actress Rasika Sunil | rasika sunil speaks about her bold image on social media platform

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘राज्यात धार्मिक दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा कुटील डाव, फडणवीसांनी राजीनामा द्यावा’, काँग्रेस आक्रमक

Jalna ACB Trap News | 32 हजाराची लाच घेणार्‍या सरपंचास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले

Pune Police News | माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर ‘ब्रेन डेड’ झालेले पुणे पोलिस दलातील स्वप्नील गरड यांचं निधन; पुणे पोलिस दलावर शोककळा