अभिनेत्री रवीना टंडननं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अचानक सुरू केला ‘डान्स’, लाजून तोंड लपवून पळाली तिची मुलगी ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात कोरोनामुळं भीतीचं वातावपण पसरलं आहे. अशातच अभिनेत्री रवीना टंडन हिनं चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. व्हिडीओत रवीना पती अनिल थडानी आणि मुलगी राशासोबत दिसत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतल्या न्यूयॉर्क सिटीच्या रस्त्यावर फिरतानाचा आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रवीनानं सांगितलं की, तिच्यामुळं कशा प्रकारे तिच्या मुलीला लाजल्यासारखं झालं होतं आणि तिला तिथून पळून जावंसं वाटत होतं.

व्हिडीओत दिसत आहे की, रवीनानं रेड कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तिच्या मुलीनं टॉप आणि हॉट पँट घातली आहे. पती आणि मुलीसोबत रस्त्यानं फिरताना रवीना टंडन अचानक डान्स करताना दिसते. मुलगी राशा तिला असं न करण्यास सांगते यानंतर उत्साहात ती आणखी डान्स करू लागते. ती एका अनोळखी माणसालाही डान्स करण्यासाठी विचारते. यानंतर तिची मुलगी पळत अनिल थडानीकडे जाते.

यानंतर रवीना पती अनिल थडानीला डान्स करायला सांगते. तोही आपल्या वरातवाल्या डान्सच्या अंदाजात डान्स करायला लागतो. यानंतर तिची मुलगी राशा हे सगळं पाहून जोरात पावलं टाकत कॅमेऱ्यासमोर तोंड लपवत पुढच्या बाजूला जाते. रवीनाचा हा थ्रोबॅक व्हिडीओ 2017 मधील असून सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.