अभिनेत्री रेखा यांचा अभिनयाबद्दल धक्कादायक खुलासा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रेखा (Rekha) यांची ओळख आहे. चिरतरूण सौंदर्य, अभिनय आणि मादक अदा यामुळं आजही प्रक्षेक रेखा यांच्यावर फिदा आहेत. रेखा यांची प्रोफेशनल लाईफ जेवढी गाजली तेवढंच त्यांचं खासगी आयुष्यही वादग्रस्त राहिलं आहे. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केलं होतं. परंतु त्यांनी वयाच्या 45 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. सर्वांनाच त्यांच्याविषयी खूप माहिती आहे. रेखा यांच्या बद्दल आज आपण एक असा खुलासा करणार आहोत जो खूप कमी लोकांना माहिती आहे.

तुम्हाला माहित नसेल कदाचित परंतु मिस्टर नटरवलाल, उमराव जान, आणि सिलसिला अशा एकापेक्षा एक सिनेमात काम करणाऱ्या रेखा यांना कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. जेव्हा त्या खून भरी मांग हा सिनेमा केला तेव्हा त्यांना अभिनेत्री बनण्याचा निर्णय योग्य वाटला.

https://www.instagram.com/accounts/activity/

आपण दुसंर काही काम यापेक्षा जास्त चांगलं करूच शकत नाही असं त्यांना याच सिनेमामुळं वाटू लागलं आणि पटलंसुद्धा. सिनेमात काम करणं त्यांच्यासाठीच होतं असंही त्यांना तेव्हा वाटू लागलं.

रेखा सावळ्या असूनही सुंदर आणि ग्लॅमरस हिरोईन्सच्या जगात त्यांची जादू जराही कमी झाली नाही. अभिनया सोबत आपल्या लुक आणि सौंदर्यासाठी त्या आजही फेमस आहेत. वयाची 65 वर्षे पार केल्यानंतरही रेखा आपल्या सौंदर्यानं आजही सर्वांना भुरळ घालतात.

रेखा यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रंगुला रत्नम या तेलगू सिनेमातून त्यांनी फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. सावन भादो या सिनेमातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला होता. मिस्टर नटरवलाल, उमराव जान, आणि सिलसिला अशा अनेक हिट सिनेमात त्यांनी काम केलं आहे.