अभिनेत्री रेखा ‘बिग बी’ नव्हे तर ‘या’ सुपरस्टारच्या नावानं लावतात ‘सिंदूर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार रेखा यांच्या लग्नाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. आपण पाहिलंय की प्रत्येक पार्टी आणि इव्हेंटमध्ये रेखांच्या भांगात सिंदूर म्हणजेच कुंकू असतं. परंतु आतापर्यंत सर्वांना हाच प्रश्न पडला होता की, रेखा कोणाच्या नावानं सिंदूर लावतात.

यासीन उस्मान यांनी आपलं पुस्तक रेखा : द अनटोल्ड स्टोरी मध्ये रेखांच्या भांगातील सिंदूरचं सिक्रेट सांगितलं आहे. त्यांनी यात लिहिलंय की, रेखा अभिनेता संजय दत्तच्या नावानं सिंदूर लावतात. यासीन यांनी या पुस्तकात असंही लिहिलं आहे की, रेखा आणि संजय दत्तनं लपून छपून लग्न केलं होतं. यासीनच्या पुस्तकानुसार, रेखांचे पती विनोद मेहरांच्या मृत्यूनंतर रेखा आणि संजय दत्त यांच्यात जवळीकता वाढली होती.

विनोद मेहरांच्या मृत्यूनंतर रेखा ढासळल्या होत्या. रेखा आणि संजय दत्तनं जमीन आसमान या सिनेमात सोबत काम केलं होतं. शुटींगदरम्यान दोघंही एकमेकांसोबत राहू लागले. यासीन यांनी पुस्तकात म्हटलं आहे की, यावेळीच संजय दत्त आणि रेखा यांनी लग्न केलं होतं. परंतु या लग्नाबद्दल कोणालाही माहिती नव्हतं. जेव्हा सुनील दत्त यांना या लग्नाबद्दल समजलं तेव्हा त्यांनी संजय दत्तचं लग्न ऋचा शर्मासोबत लावून दिलं. तुम्हाला माहिती असेल की, सजय दत्त रेखा पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे.