आली रे आली, आर्ची आली…!, तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्याची तुडुंब गर्दी

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आजपासून महाराष्ट्रात १२ वीची परीक्षा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे सैराट चित्रपटफेम अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचीही १२ वीची परीक्षा आहे. रिंकु परीक्षा देण्यासाठी तिच्या परीक्षा केंद्रावर दाखल झाली. त्यावेळी तीला पाहण्यासाठी टेंभूर्णी येथील परीक्षा केंद्रासमोर चाहत्यांनी गर्दी केली होती.

रिंकु सैराट चित्रपटानंतर दहावीची परीक्षा उत्तम गुणांसह पास झाली होती. त्यानंतर आता तिच्या चाहत्यांनी तिला बारावीच्या परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत टेंभूर्णी येथील तुळजाभानी कला आणि वाणिज्य विद्यालयात परीक्षा देण्यासाठी आपल्या आई-वडिलांसह आली.

त्यावेळी तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तुडूंब गर्दी केली होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने आधीत पोलिसांकडे अधिकचा पोलीस बंदोबस्त मागितला होता. त्यामुळेच रिंकुसह इतर परिक्षार्थींना याचा त्रास झाला नाही.

दरम्यान, रिंकुचा बैठक क्रमांक P154293 असा आहे. रिंकूने राज्यभऱातील बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात आता अर्चीच्या परिक्षेनंतर चाहता वर्ग तिच्या निकालाची वाट आवर्जून पाहिलं, हे नक्की.