महाराष्ट्राला ‘सुन्न’ करणाऱ्या ‘त्या’ व्हिडीओवर रिंकू राजगुरूनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जालना जिल्ह्यातील गोंदेगाव येथे प्रेमी युगुलाला माथेफिरु टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना काहीदिवसांपुर्वी घडली होती. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत 5 आरोपींना अटक केली. महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालवणाऱ्या या घटनेवर अभिनेत्री रिंकू राजगुरु हीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जालन्यामध्ये प्रेमी युगुलाला झालेली मारहाण आपल्याला योग्य वाटते का ? असा प्रश्न कार्यक्रमादरम्यान रिंकू राजगुरु हीला विचारण्यात आला होता. त्यावर रिंकू म्हणाली की, ‘हे योग्य नाही. खरतर मी देखील इतकी मोठी नाही या प्रश्नाला उत्तर द्यायला, पण आपण आत्ता ज्या पद्धतीने घडलेला प्रकार सांगितला ते एकूण कोणालाही योग्य वाटणार नाही.’

गोंदेगाव शिवारात एका प्रेमी युगुलाला गावातील एका टोळक्याने मारहाण करीत मुलीशी अश्लील वर्तन केले होते. त्याचबरोबर मोबाईलमध्ये व्हिडिओ रोकॉर्डिंग करुन तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला होता. याप्रकरणी नंतर पोलिसांनी कारवाई केली. मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल करुन 5 मुख्य आरोपींना अटक केली आहे.