Actress Sagarika Sona Suman | ‘राज कुंद्रा म्हणाला ‘न्यूड ऑडिशन दे’, अभिनेत्री सागरिका सोना सुमनचा धक्कादायक आरोप

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Actress Sagarika Sona Suman | बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. यावरून सर्वत्र खळबळ माजली आहे. राज कुंद्रावर अश्लील चित्रफित तयार करण्याचा आणि तो इंटरनेटवर रिलीज करण्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि याबाबतीत पोलिसांनी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचंही म्हटलं आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक प्रकरणे आत्ता समोर येत आहेत. तर आता अभिनेत्री सागरिका सोना सुमनने (Actress Sagarika Sona Suman) देखील खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. राज कुंद्राने (Raj Kundra) नग्न होऊन ऑडिशन द्यायला सांगितलं असल्याचा गंभीर आरोप अभिनेत्री सागरिकाने केला आहे.

सोमवारी रात्री राज कुंद्राला (Raj Kundra) अटक केल्यांनतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन (Actress Sagarika Sona Suman) हिने कुंद्रावर गंभीर आरोप केला आहे. अभिनेत्री सागरिकाने एका व्हिडीओतून तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे की, ‘मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यात मोठे लोक सहभागी आहेत. राज कुंद्रा याचं नाव समोर आलंय. लॉकडाउनच्या काळात मला देखील एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट 2020 रोजी मला एका वेब सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर आली होती. असं तिने सांगितलं.

तसेच, ऑफरवरून मी होकार दिल्यानंतर राज कुंद्राच्या (Raj Kundra) कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत (Umesh Kamat) यांचा मला फोन आला. माझी ऑनलाइन ऑडिशन घेण्याचं ठरलं होतं. मी व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी झाल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन (Nude audition) देण्याची मागणी केली गेली. परंतु, मला धक्काच बसला आणि मी नकार देत कॉल बंद केला. याबाबत एक गंभीर आरोप अभिनेत्री सागरिकाने केलाय.

या दरम्यान, पुढे तिने सांगितलं आहे की, ‘त्या व्हिडीओत कॉलमध्ये 3 लोक होते.
ज्यामध्ये एकाचा चेहरा दिसत नव्हता, परंतु, ती व्यक्ती राज कुंद्रा होती.
कारण कुंद्राचा सहाय्यक असलेला कामत वारंवार या सर्व वेबसाईट राज कुंद्रा चालवतात, असं म्हणत होता.
परंतु, राज कुंद्राने मला न्यूड ऑडिशन द्यायला सांगितलं होतं.
राज कुंद्राचं नाव देखील त्यावेळी समोर आलंय.
तसेच, लवकरात लवकर या नागरिकांना अटक करण्यात यावी, कारण खूप लोकांचं आयुष्य या रॅकेटमुळे खराब होत असल्याचं देखील अभिनेत्री सागरिकाने (Actress Sagarika Sona Suman) आरोप करत सांगितलं आहे.

Web Title : Actress Sagarika Sona Suman | porn flims apps case raj kundra arrested actress sagarika shona suman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Porn Film Case मध्ये पती राज कुंद्राच्या अटकेने अस्वस्थ झालेल्या शिल्पा शेट्टीनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Poonam Pandey | पूनम पांडेने देखील राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; Video व्हायरल

MMRDC | ठाणेकरांसाठी खुशखबर ! ठाणे ते बोरिवलीचा प्रवास लवकरच होणार अवघ्या 15 मिनिटात