Bold अवतारातील ‘हे’ खास फोटो शेअर करत महेश मांजरेकरांच्या लेकीनं दिल्या New Year च्या शुभेच्छा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डायेरक्टर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची लेक आणि सलमान खान (Salman Khan)ची दबंग 3 मधील हिरोईन सई मांजरेकर (Saiee Manjrekar) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दबंग 3 ला घेऊन सई नेहमीच चर्चेत येताना दिसली आहे. सध्या मात्र आपल्या काही बोल्ड फोटोंमुळे सई चर्चेचा हिस्सा बनली आहे. आपल्या लुकनं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सईनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हे खास फोटो शेअर करत तिनं सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सईचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत तिच्या ब्युटी आणि बोल्डनेसचं कौतुक केलं आहे.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सलमान खानच्या दबंग 3 सिनेमात तिनं काम केंल आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. हा सईचा डेब्यू सिनेमा होता. लवकरच ती मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावर (2008 Mumbai Attacks) आधारीत सिनेमात काम करताना दिसणार आहे. मेजर (Major) असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची स्टोरी 26/11 च्या हल्ल्यातील हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या अवतीभोवती फिरताना दिसेल.

https://www.instagram.com/p/CG_2MXTAYpB/

https://www.instagram.com/p/CFgZT24g0wI/

https://www.instagram.com/p/CEFHY8qJSxR/