लॉकडाऊन’दरम्यान अभिनेत्री सना सईदच्या वडिलांचं निधन, अंतिम दर्शन करणंही शक्य झालं नाही


पोलीसनामा ऑनलाईन :
बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या कुछ कुछ होता है या सिनेमात अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईद हिच्या वडिलांचं निधन झाल्यानं सध्या ती दु:खात आहे. सध्या देशात कोरोनामुळं लॉकडाऊन आहे. सना युएसमध्ये आहे. तिनं तिचे वडिल अब्दुल अहद सईद यांना कायमचं गमावलं आहे. सनाच्या वडिलाचं निधन 22 मार्च 2020 रोजी झालं, जेव्हा देशात जनता कर्फ्यु होता. परंतु यावेळी मात्री ती युएसमध्ये होती. तिथे लॉकडाऊन असल्यानं तिला भारतात येणं शक्य झालं नाही. वडिलांना शेवटचं पाहण्याचीही संधी तिला मिळाली नाही.

एका इंग्रजी वृत्तापत्राशी बोलताना सना म्हणाली, “माझ्या वडिलांना डायबिटीज होता. यामुळं त्यांच्या शरीरातील काही अवयव खराब झाले होते. मला जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा मी लॉस एंजेलिसमध्ये होते. सकाळी सात वाजता मला समजलं की, माझे वडिला या जगात नाहीत. मला त्यावेळी माझ्या आईला आणि बहिणीला मिठी मारायची होती. परंतु मला ते काही शक्य झालं नाही. ज्या स्थितीत मी माझ्या वडिलांना गमावलं आहे ते खूप त्रासदायक आहे. ते खूप त्रासात होते. मी आशा करते की, ते आता एका चांगल्या ठिकाणी असतील.”

सना पुढे म्हणते, “ज्या दिवशी वडिल गेले त्या दिवशी मी जनता कर्फ्युमध्ये होते. कुटुंबियांनी त्यांना त्याच दिवशी दफन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त तीन तास होते. त्यांना दफन करायला घेऊन जाताना पोलिसांनी अवडवलंही होतं. जेव्हा घरच्यांनी त्यांना डेथ सर्टिफिकेट दाखवलं तेव्हा त्यांनी परवागनी दिली.”

सना एका इव्हेंटसाठी लॉस एंजेलिसमध्ये गेली होती. कोरोनामुळं करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं ती तिकडेच अडकली होती.