बनारसमध्ये डोक्यावर ओढणी घेऊन गंगा आरतीमध्ये सहभागी झाली सारा अली खान (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – कुली नंबर 1 सिनेमाची शुटींग संपवल्यानंतर आता अभिनेत्री सारा अली खान डिव्हाईन ट्रीपवर गेली आहे. सोशल मीडियावर सारानं अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती आपल्या डीव्हाईन ट्रीपचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोत साराचा ट्रॅडिशनला अवतार दिसत आहे ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.

सारा अली खान सध्या वाराणसी ट्रीपचा आनंद घेत आहे. सारानं वाराणसी ट्रीपचे फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. फोटो शेअर करताना ती म्हणते, गंगा नदी. फोटोत दिसत आहे की, तिनं डोक्यावर ओढणी घेतली आहे आणि ती गंगा आरती मध्ये सहभागी झाली आहे. तिचे इतरीही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यातील एका फोटोत ती नावेत दिसत आहे. यात गंगा किनारी तिचा रिलॅक्स मूड दिसत आहे.

साराचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहे. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट करत तिच्या सौंदर्याचं कौतुकही केलं आहे. सलवार सूटमध्ये सारा खूपच गॉर्जियस दिसत आहे. साराचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन असणार आहे.