सध्या बॉलिवूडमध्ये बोलबाला असलेल्या ‘या’ अभिनेत्रीला राजकारणात उतरायचंय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बॉलिवूडमध्ये सारा अली खान हिचा चांगलाच बोलबाला आहे. आत्‍तापर्यंत केवळ 2 चित्रपट तिच्या नावावर असले तरी तिच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान हिने अलिकडेच केलेल्या एका वक्‍तव्यामुळे बॉलिवूड आणि राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावल्यानंतर मला राजकारणात उतरण्याची इच्छा आहे,’ असे वक्‍तव्य तिने केले आहे.

सारा हिने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाची पदवी घेतलेली आहे. राज्यशास्त्रात पदवी घेतली असल्याने तिला सहाजिकच राजकारण आणि समाजकारणात रस असणार आहे. साराने अलिकडेच एका मुलाखतीत त्याबाबत बोलुन देखील दाखविले. ‘अभिनयाला माझं पहिलं प्राधान्य असेल. मात्र, भविषयात राजकारणात जायला आवडेल,’ असं ती म्हणाली.

सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने साराने केलेल्या वक्‍तव्यामुळे बॉलीवूड आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सारा अली खान ही सध्या सोशल मीडियावर देखील खुप सक्रिय आहे. तिच्या इस्टाग्राम अकाऊंटला अनेकांनी फालो केले आहे तर तिच्या अनेक फोटोला लाखो चाहत्यांनी लाइक केले आहे. त्यामुळे तिने राजकारणात जाण्याबाबत बोलण्याने तिच्या चाहत्यांमध्ये देखील खळबळ उडाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like