फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री शेफाली जरीवालानं प्रेग्नंसीबद्दल सोडल मौन ! केला ‘हा’ खुलासा


पोलीसनामा ऑनलाईन :
अभिनेत्री डान्सर शेफाली जरीवाला हिनं अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर लोकांनी अंदाज लावायला सुरुवात केली की, शेफाली प्रेग्नंट आहे आणि लवकरच ती आई होणार आहे. अनेकांनी याबाबत कमेंट करायला सुरूवात केली.

शेफालीनं मंगळवारी पती पराग त्यागीसोबत एक फोटो शेअर केला होता. यात ती बेबी बंप दाखवल्या सारख्या पोज मध्ये दिसली. तिल पराग त्यागीनंही मागून अलगत हद केलं होतं. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना वाटलं की, कदाचित शेफाली प्रेग्नंट आहे.

जसा शेफालीचा फोटो समोर आला तसा तो व्हायरल होताना दिसला. अनेक चाहते तिला प्रश्न विचारू लागले की, ती प्रेग्नंट आहे का. हे सगळं पाहिल्यानंतर शेफालीनं मौन सोडत चाहत्यांच्या मनातील शंका दूर केली. शेफालीनं चाहत्यांना रिप्लाय देत सांगितलं की, ती प्रेग्नंट नाहीये. तिनं फक्त जास्त खाल्ल्यामुळं कदाचित तुम्हाला तसा भास झाला असावा.

शेफालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 13 मध्ये आली होती. बिग बॉसच्या घरात असताना ती आसिम रियाजसोबत आणि घरातील इतरांसोबत झालेल्या वादानं खूपच चर्चेत आली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like