Shikha Malhotra Paralysis : ब्रेन स्ट्रोकनंतर पॅरालिसिसची शिकार झाली अभिनेत्री शिखा मल्होत्रा ! 1 महिन्यापूर्वीच झाली होती ‘कोरोना’मुक्त

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra) कोरोना काळात नर्स बनून लोकांची सेवा करत होती. आता ती ब्रेन स्ट्रोकची शिकार झाली आहे. इतकंच नाही तर कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या शिखाला कोरोनाची लागणही झाली होती.

https://www.instagram.com/p/CIo8dSQpOVh/

आता शिखाला ब्रेन स्ट्रोकनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रेन स्ट्रोकमुळं तिच्या शरीराचा उजवा भाग खूप प्रभावित झाला आहे आणि तिला अर्धांगवायू (Paralysis) झाला आहे. यानंतर तिला जुहूच्या कूपर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. कोरोनातून बरी होऊन तिला काहीच महिने झाले होते.

https://www.instagram.com/p/CH2DL4Ppo2z/

शिखाच्या मॅनेजरनं सांगितलं की, तिला 10 डिसेंबर (वार गुरुवार) च्या रात्री पॅरालिसिस स्ट्रोक आला. यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची अवस्था अशी आहे की तिला बोलायला देखील जमत नाहीये. डॉक्टर तिला बरं करण्यासाठी शक्य तो प्रत्येक प्रयत्न करत आहे. तिचे चाहतेही तिच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

https://www.instagram.com/p/CHQd5B-p7oV/

शिखानं हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं. ती आयसोलेशन डिपार्टमेंटमध्ये होती. शिखानं दिल्लीच्या वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज अँड सफदरगंज हॉस्पिटलमधून बीएससी ऑनर्स केलं आहे.

https://www.instagram.com/p/CGrzRkzJbHr/

https://www.instagram.com/p/CGMubBwJgD9/