अभिनेत्री श्रद्धा कपूर यावर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत ?

पहा श्रद्धा आहे कोणाच्या प्रेमात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये मागील वर्षांपासून लग्नाचा ट्रेंड जोरदार सुरु आहे. नेहा-अंगद, दीपिका-रणवीर, सोनम कपूर-आनंद, प्रियंका-निक यांचा विवाहसोहळा धूम धडाक्यात साजरा झाला. आता यंदाच्या वर्षी फरहान अख्तर-शिबानी दांडेकर, रणबीर-आलिया, अर्जुन-मलाइका या जोड्या लग्न बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा बी टाऊन मध्ये सुरु आहे. आता या यादीत अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव जोडले गेले आहे. यंदा श्रद्धा कपूर देखील विवाह बांधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

श्रद्धा कपूर रोहनच्या प्रेमात
अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणाशी लग्न करणार असा प्रश्न तुम्हाला सहजिकच पडला असेल. श्रद्धा कपूर आणि सेलिब्रेटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा यांच्यात प्रेम प्रकरण सुरु असल्याची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये होती. त्यानंतर मागील वर्षापासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. आता हे दोघेही यावर्षी लग्न बंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरच्या कुटुंबीयांनी लग्नास होकार कळवला असल्याची माहिती आहे. श्रद्धा कपूर सध्या सुशांत सिंह राजपूतसोबत छिछोर चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. त्याशिवाय प्रभाससोबतचा ‘साहो’ चित्रपटदेखील प्रदर्शानाच्या वाटेवर आहे. त्याशिवाय वरुण धवन, रेमो डिसुझासोबत ‘स्ट्रीट डान्सर’ चित्रपटात झळकणार आहे.

Shraddha Kapoor

You might also like