COVID-19 : TV शो ‘इश्कबाज’ फेम श्रेनु पारिखला ‘कोरोना’, हॉस्पिटलमध्ये झाली अ‍ॅडमिट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टीव्ही अभिनेत्री श्रेनु पारिख हिला कोरोनाची लागम झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द श्रेनुनंचं यासंदर्भात सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. सध्या ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि रिकवर होत आहे. काही दिवसांपूर्वीच ती कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे.

श्रेनु पारिख आढळली कोरोना पॉझिटीव्ह

श्रेनुनं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं तिला कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. सध्या ती उपचार घेत आहे असंही ती म्हणाली आहे. श्रेनुनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, “काही दिवसांपूर्वची मी कोरोना पॉझिटीव्ह आढळले. सध्या मी हॉस्पिटलमध्ये असून रिकवर होत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेत नक्की ठेवा. मी कोरोना वॉरियर्सचे आभार मानते, जे या कठिण आणि भयानक परिस्थितीतही लोकांची आणि रुग्णांची सेवा करत आहे.”

‘प्लिज खूप खबरदारी घ्या आणि स्वत:ला सुरक्षित ठेवा’

श्रेनु असंही म्हणाली की, “एवढी खबरदारी घेऊनही जर तुम्हाला याची लागण होत असेल तर यावरूनच तुम्ही या अदृश्य राक्षसाच्या शक्तीच अंदाज लावा, ज्याच्यासोबत आपण लढत आहोत. प्लिज खूप खबरदारी घ्या आणि स्वत:ला सुरक्षित ठेवा.