Photo : रेड लाईट एरियात दिसली अभिनेत्री श्वेता बासु, सेक्स स्कँडलमुळं आधीच सापडली होती वादात !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस श्वेता बासु प्रसाद (Shweta Basu Prasad) तिच्या फिल्मी करिअरपेक्षा वादग्रस्त कामांमुळंच जास्त चर्चेत राहिली आहे. श्वेता 2014 साली हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये अडकली होती. यामुळं तिला दोन महिने रेस्क्यु होममध्ये ठेवण्यात आलं होतं. हैदराबाद सेशन कोर्टानं तिला क्लीनचीट दिली होती. याचा तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाला होता. सध्या श्वेता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

श्वेताचा एक फोटो समोर आला आहे ज्यात ती मुंबईच्या रेड लाईट एरियात फिरताना दिसत आहे. तिथल्या काही महिलांसोबत ती गप्पा मारताना स्पॉट झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लवकरच ती मधुर भांडारकर डायरेक्टेड इंडिया लॉकडाऊन सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात देहविक्री करणाऱ्या मुलीची भूमिका तिनं साकारली आहे.

यासाठीच ती कामाठीपुरा एरियात गेली होती. तिथं जाऊन महिलांची बोलण्याची पद्धत, भाषा हे तिला जाणून घ्यायचं होतं. तिला तिचं बोलणं बदलणं गरजेचं असल्याचंही तिनं सांगितलं आहे.

श्वेताच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं बॉयफ्रेंड रोहित मित्तल सोबत लग्न केलं होतं. पंरतु हे लग्न जास्त काळ टिकलं नाही. लग्नाच्या वर्षभरातच तिनं घटस्फोट घेतला.

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2002 साली आलेल्या मकडी सिनेमातून तिनं बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. 2014 मध्ये सेक्स स्कँडलमध्ये नाव समोर आल्यानंतर पुढील एक-दोन वर्ष तिला बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झालं होतं. 2017 साली तिनं बद्रीनाथ की दुल्हनिया या सिनेमातून कमबॅक केलं होतं. आता लवकरच ती मधुर भांडारकर यांच्या इंडिया लॉकडाऊनमध्ये झळकणार आहे.

https://www.instagram.com/p/CD8gkuVBDni/