अभिनेत्री श्वेता तिवारीनं दिला ‘डेमो’ ! ‘अशा’ प्रकारे करते अप्पर बॉडी वर्कआऊट (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री श्वेता तिवारी हिला अनेक चाहते तिच्या फिनेटसबद्दल विचारत असतात आणि तिचं कौतुक करत असतात. अलीक़डेच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत पलक तिवारी दिसत आहे. पलकमुळं श्वेता पुन्हा चर्चेत आली आहे.

श्वेतानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना ती म्हणते, “माझ्या अप्पर बॉडीच्या एक्सरसाईजचा एक छोटा डेमो व्हिडीओ.” व्हिडीओत दिसत आहे की, पलक तिवारी सांगते की, घरातील लहान बाळाला घेऊन आपण बायसेप्स आणि बॅक वर्कआऊट कसं करू शकतो. हा व्हिडीओ काहीसा कॉमेडी आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

Time pass 🤳!!!

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

अनेक चाहते या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. एकानं तर पलकच्या हेल्थवरून कमेंट करत म्हटलं की, “श्वेता तिवारीनं तिच्या मुलीला वेळेत जेवण द्यायला हवं.” याशिवाय इतर काहींनी तिला क्युट म्हटलं आहे. अनेकांनी त्यांच्या भानवना मांडत वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

पलक व्हिडीओत सांगत आहे की, क्वारंटाईन पीरियडमध्ये जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची असेल आणि तुमच्याकडे काही साधन नसेल तर निराश होऊ नका. तुम्ही एका लहान बाळाच्या मदतीनं एक्सरसाईज करू शकता. यात ती एका लहान मुलाला उचलत एक्सरसाईज करून दाखवताना दिसते.

View this post on Instagram

❤️❤️❤️ @palaktiwarii #etherealgirl

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

You might also like