हस्तमैथुन ‘या’ अभिनेत्रीला वाटतो कॉफी पिण्या इतका सोपा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-सेन्सॉर बोर्डाच्या जाचक नियमातून सुटका मिळवण्यासाठी वेब सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार मंडळी  आपल्याला हवी तशी कलाकृती साकारण्याच्या खटाटोपात असल्याचे अलीकडच्या काळात दिसून येते आहे. असे प्रयोग रसिक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतात कारण प्रेक्षकांना हवी असलेली किंबहुना प्रेक्षकांना हवी असलेली कलाकृती चित्रीकरणातून  उतरवली जाते. अशाच एका वेब सिरीज मध्ये श्वेता त्रिपाठी या अभिनेत्रीने केलेल्या अभिनयाबद्दल तो अभिनय कॉफी पिण्या इतका सोपा वाटतो असे उत्तर दिले.

चौकटीच्या बाहेर जाऊन मोकळीक अजमावलेला अभिनय बघण्यासाठी नेटीजन आता अशा वेब सिरीजचा वापर करत आहेत. या वेब सिरीज मधून प्रेक्षकांच्या कल्पनेतील विलास कथानकात साकारण्यात आलेला असतो. म्हणून आंबट शौकीन पॉर्न फिल्म बघण्या ऐवजी वेब सिरीज मधल्या कथानकाना  बघत आहेत. त्याच प्रमाणे येत्या काळात अशा वेब सिरीजचे पेव नेटीजन वर उसळले नाही तरच नवल !
‘अॅमेझॉन प्राइम’ची ही सीरिज सध्या चर्चेचा भाग बनली आहे. खरं तर सीरिजच्या ट्रेलरमधून हि सिरीज भडक असल्याचे लक्षात येते. मिर्जापूर असे या  वेब सिरीजचे नाव असून यात अनेक चांगल्या  कलाकारांची वर्णी लागली असून मानस या मालिकेतील श्वेता त्रिपाठी या  महत्वाची भूमिका करत असून गोलू गुप्ता हे पात्र त्या यात साकारत आहेत. याबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी खूपच मोकळं उत्तर दिल्यामुळे त्या माध्यमांच्या चर्चेत आल्या आहेत.

काय म्हणाल्या श्वेता त्रिपाठी
‘अॅमेझॉन प्राइम’  या वेब सिरीज मध्ये ग्रंथालयाच्या एका दालनात  गोलू गुप्ता हि विद्यार्थिनी कामसूत्राचें एक पुस्तक वाचत बसलेली असते  हस्तमैथुनाविषयी वाचत असल्याने तिच्यात पुरुषी उत्तेजना जागृत होतात. त्यात ती  पुरुषाप्रमाणे हस्तमैथुन करण्याचा प्रयत्न करते असे दृश्य चित्रण करण्यात आले आहे. यावर श्वेता त्रिपाठी म्हणाल्या आहेत कि, पुरुषाप्रमाणे  हि महिलांना पुरुषी भावना असू शकतात मला यात वेगळं असं काही वाटलं नाही एवढंच बोलून त्या थांबल्या नाहीत तर हस्तमैथुनात एवढे काय असते तेव्हा मला हे दृश्य चित्रित करताना कॉफी पिण्या एवढे सोपे वाटले.

मिर्झापूर या वेब सिरीज मधून भडक प्रसंग दाखवल्यामुळे हि वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार आहे असे नेटीजन मध्ये बोलले जाते आहे.