अभिनेत्री स्मृती खन्ना झाली ‘आई’, ‘लॉकडाऊन’मध्ये हॉस्पिटलला घेऊन गेला पती गौतम गुप्ता

पोलिसनामा ऑनलाइन –टीव्ही अ‍ॅक्ट्रेस स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. स्मृतीनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मेरी आशिकी तुमसे ही फेम स्मृती खन्न बुधवारी सायंकाळी 4 वाजता एका मुलीला जन्म दिला आहे. आई वडिल झाल्यानंतर कपल खूपच एक्सायटेड आहे. तिनं आपल्या मुलीचा पहिला फोटोही सोशलवर शेअर केला आहे.

स्मृतीनं तिच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे ज्यात दिसत आहे की, स्मृती आणि गौतम बसले आहेत. स्मृतीनं तिच्या मुलीला मांडीवर घेतलं आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये स्मृती म्हणते, “आमची राजकुमारी आली आहे.”

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गौतम म्हणाला, “आई आणि मुलगी दोघीही निरोगी आहेत.” यासोबतच गौतमनं खुलासा केला होता की, लॉकडाऊनदरम्यान तो स्मृतीला घेऊन व्यवस्थित हॉस्पिटलला पोहोचला आहे.

त्यानं सांगितलं की, तो राहायला जुहूमध्ये आहे आणि हॉस्पिटल खारमध्ये आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही एकट्यानेच हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला. आम्हीही दोघंही सुरक्षित पोहोचलो. लॉकडाऊन असतानाही सर्वकाही सुरळित झालं याचा आनंद आहे असंही त्यानं सांगितलं.

स्मृती खन्ना आई झाही हे कळायलानंतर अनेक चाहते तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहेत.