दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला अटक ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा मिशन मंगल हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु याआधीच सोनाक्षी सिन्हाला अटक झाल्याचे समोर आले आहे. सध्या सोनाक्षी सिन्हाचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. सध्या हे व्हिडीओ आगीसारखे व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओत दिसत आहे की, तिला अटक केली जात आहे. तिला बेड्या घालतानाचा हा व्हिडीओ आहे. परंतु सोनाक्षीला खरंच अटक झाली की, ती प्रमोशनसाठी हे करत आहे हे मात्र अद्याप समजलेले नाही. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असे वृत्तही समोर आले होते.

व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, सोनाक्षीला बेड्या घातल्या जात आहे आणि ती विरोधही करत आहे. दुसरा एक व्हिडीओ आहे ज्यात ती कॅमेऱ्यांपासून लपत आहे आणि रुममधून बाहेर जात आहे. तिच्या मागे मीडियाची गर्दीही दिसत आहे.

सोनाक्षीचे हे दोन्हीही व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आले आहेत. दोन्हीही व्हिडीओ पााहिले तर तिला अटक झाली आहे असे दिसत आहे. परंतु हे तिने प्रमोशनसाठी केलं आहे की तिला खरंच अटक झाली आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. सोनाक्षीचे हे दोन्ही व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –