अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे आई वडील पराभवाच्या छायेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे आई वडील दोघेही पराभवाच्या छायेत आहेत. भाजपमधून कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी पटना साहिबमधून तर लखनऊमधून पूनम सिन्हा यांनी समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढविली. दोघेही सध्या पराभवाच्या वाटेवर आहेत.

शत्रू पटना साहिमधून खामोश

पटना साहिब मतदारसंघात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शत्रुघ्न सिन्हा यांचा भाजपचे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यात चुरस झाली. त्यात शत्रूघ्न सिन्हा हे पराभवाच्या छायेत आहेत. रविशंकर प्रसाद हे तब्बल ९१,८०७ मतांनी आघाडीवर आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१४ मध्ये पटना येथूनच भाजपकडून ही जागा जिंकली होती.

त्यानंतर मात्र वेळोवेळी त्यांनी पंतप्रधान व भाजपविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा भाजपमधून पत्ता कट करण्यात आला. भाजपने शत्रुघ्न सिन्हा यांना पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाशी असलेले तीन दशकांचे नाते तोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना पाटणा साहिबमधून उमेदवारी दिली होती.

लखनऊमधून पूनम सिन्हांचा पराभव निश्चित

तर त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांन या समाजवादी पक्षाकडून लखनऊमधून निवडणूक लढवत आहेत. पूनम सिन्हा यांची गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट लढत झाली. त्यात पूनम सिन्हा यांना १८९०८५, तर राजनाथ सिंह यांना ४२३५३६ मते पडली. त्यात राजनाथ सिंह २,३४,४५१ यांनी मुसंडी मारली असून त्यांचा पराभव निश्चित असल्याचे दिसते आहे.