Video : ‘ही’ अभिनेत्री टीम इंडियासाठी खूपच ‘लकी’

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था – भारतामध्ये कोटींच्या संख्येत क्रिकेटचे चाहते आहेत. अनेक क्रिकेटवेडे क्रिकेट पाहण्यासाठी परदेशात जातात. यामध्ये सामान्य माणूस, बिजनेसमन याशिवाय अनेक कलाकारही आहेत. कलाकारांपैकी एक नाव सांगायचे झाले तर, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील ‘अप्सरा’ म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे. सोनाली कुलकर्णी भारताचे क्रिकेट सामने लाईव्ह पाहण्यासाठी परदेशात गेली आहे. लाईव्ह सामने पाहण्याची संधी सुटू नये म्हणून ती चक्क इंग्लंडमध्ये गेली आहे.

सध्या सोनाली कुलकर्णी चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ ट्विटरवरून समोर आला आहे जो सध्या झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत सोनालीचे खास हावभाव टिपलेले आहेत. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या अटीतटीच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या एका षटकात बॅट्समनने 17 धावा काढल्या तेव्हाचे सोनालीचे हे हावभाव आहेत. विशेष बाब अशी की, क्रिकेट वर्ल्ड कपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरू हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोनाली कुलकर्णी चकित झाली आहे असे यात दिसत आहे. भारतासाठी ती चिंतेत आल्याचेही दिसते.

भारत आणि बांग्लादेश सामन्यात भारताने बांग्लादेशचा 28 धावांनी पराभव केला. भारत विजयी झाल्यानंतर उडी मारतानाही सोनालीचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोवर अभिनेता अमेय वाघने खास कमेंट केली आहे. आपल्या कमेंटमध्ये अमेय वाघ म्हणतो आहे की, “तू स्टेडियममधून हलू नकोस… तू लकी आहेस.” सोनाली कुलकर्णीचा हा फोटोही झपाट्याने व्हायरल झाला आहे. सोनालीच्या या फोटोवरील अमेय वाघची कमेंटही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती