अभिनेत्री सोनम कपूर लपवतेय तिचं ‘बेबी’ बंप ? (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसच्या भीतीनं परदेशात गेलेले बॉलिवूड स्टार आता एकेक करून मायदेशी परतताना दिसत आहेत. इतकंच नाही तर परत आल्यानंतर अनेकजण स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवत आहेत. अलीकडेच सोनम कपूरचा एक व्हिडीओ समोर होता ज्यात ती सासूसोबत अंतर ठेवून बोलताना दिसली होती. परंतु यानंतर आता चाहेत वेगळेच अंदाज लावताना दिसत आहेत.

सोनमच्या व्हिडीओत दिसत आहे की, ती घराच्या खिडकीतून सासू प्रिया आहुजासोबत बोलत आहे. सोनमनं स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. यावेळी तिनं खूप लूज असा व्हाईट कलरचा ड्रेस घातला होता. तिचा हा ढील्ला आउटफिट पाहून आता लोक अंदाज लावत आहेत की, सोनम कपूर प्रेग्नंट आहे.

सोशल मीडियावर अनेक चाहते असं म्हणत आहेत की, सोनम कपूर प्रेग्नंट आहे आणि बेबी बंप लपवण्यासाठीच तिनं असे ढिल्ले कपडे घातले आहेत. ही सोनम कपूरच्या प्नेग्नंट आहे असा अंदाज लावण्याची चाहत्यांची ही तशी काही पहिलीाच वेळ नाहीये. याआधीही अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत ज्या नंतर अफवाच ठरल्या आहेत.

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.

https://www.instagram.com/p/B9AR7erlOr8/

https://www.instagram.com/p/B9RdB4bl9K3/

https://www.instagram.com/p/B9RcbfpFOCV/