US वरून आल्यानंतर अभिनेत्री श्रीनू पारीखला घरी जायचं होतं, ‘लॉकडाऊन’मुळं ‘इथं’च झाली ‘LOCK’

पोलीसनामा ऑनलाईन :24 मार्च 2020 पासून 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशात येण्या-जाण्यासाठी असणाऱ्या अनेक सेवाही सध्या बंद आहेत. इश्कबाज फेम अॅक्ट्रेस श्रीनू पारीख हिनं आपल्या अमेरिका दौऱ्याबद्दल खुलासा केला आहे. जेव्हा कोरोना भारताच्या उंबरठ्यावर आला होता तेव्हा श्रीनू अमेरिकेतून परत येत होती. तिलाही प्रश्न पडला होता की, भारतात यावं की नाही. परंतु तिच्या आईवडिलांच्या आणि दोस्तांच्या आग्रहाखातर तिनं भारतात येण्याचं ठरवलं.

अमेरिकेतून आल्यानंतर श्रीनूनं स्वत:ला मुंबईतील घरात 10 दिवस आयसोलेट केलं होतं. तिनं कोणत्याही लक्षणांशिवाय स्वत:ला आयसोलेट केलं होतं. क्वारंटाईन पीरियड बद्दल सांगताना श्रीनूनं सरकारच्या कामाचं कौतुक केलं. जनता कर्फ्यु दरम्यान बाहेर पडणाऱ्या लोकांचाही तिनं समाचार घेतला.

श्रीनू म्हणाली, “मी 15 मार्च 2020 रोजी अमेरिकेतून परत आले होते. मी 10 दिवस स्वत:ला आयसोलेट केलं. मी विचार केला होता की 14 दिवस आयसोलेट केल्यानंतर गुजरातच्या माझ्या घरी जाईल. परंतु लॉकडाऊनमुळं आता ते शक्य नाही. बॉर्डरही बंद झाल्या आहेत. मला कळत नाहीये की आता मी काय करू.”