Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सनी लिओनीने (Actress Sunny Leone) कॉन्ट्रॅक्ट प्रकरणी एफआयआर रद्द ( Actress Sunny Leone FIR Quashed) करण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात (High Court of Kerala) धाव घेतली (Sunny Leone Ran High Court of Kerala) आहे. सनी लिओनीने कोर्टात आपल्या विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे. चार वर्षांपूर्वी, राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोझिकोडमध्ये एका स्टेज परफॉर्मन्ससाठी एका कंपनीसोबत केलेल्या कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सनी लिओनीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.या संदर्भात सनीने (Actress Sunny Leone) तिच्यावर दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

अभिनेत्री सनी लिओनीने याचिकेत स्वत:वर, पती डॅनियल वेबर (Sunny Leone Husband Daniel Weber) आणि कर्मचाऱ्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत. आपण कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसल्याचा दावा तिने केला आहे.सनी लिओनी म्हणते की तिला संकटात टाकण्यात आले आहे. या खटल्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेत तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे. तसेच तर तिच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार , शिया कुन्हुमोहम्मद नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून एर्नाकुलम जिल्ह्यात नोंद
झालेल्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. शोचे संयोजक शिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे
की, सनीने स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी करार केला होता. त्यासाठी तिने 39 लाख रुपये घेतले.
पण सनी लिओन आणि इतरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही आणि रक्कमही परत केली नाही.
या प्रकरणी सनी लिओनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होती.
याशिवाय अभिनेत्रीचा पती डॅनियल वेबर आणि सनीच्या कंपनीतील कर्मचारी सुनील रजनी हे या प्रकरणात
दुसरे आणि तिसरे आरोपी आहेत.तसेच त्यांनीही या एफआयआर रद्द करण्याची मागणीही केली आहे.

Web Title :-  Actress Sunny Leone | actress sunny leone moves hc to quash fir on contract case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

Pune Crime | तडीपार गुंडाचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घुण खून; कोंढव्यातील अशोका म्युज सोसायटीजवळील घटना