‘लॉकडाऊन’मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेननं बॉयफ्रेंडसोबत केला ‘HOT’ योगा !

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल नेहमीच कोणत्या ना कोणत्या फोटोमुळं किंवा व्हिडीओमुळं चर्चेत येताना दिसत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये घरीच वेळ घालवणाऱ्या सुष्मिता सेननं काही फोटो सोशलवरून शेअर केले आहेत ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. या फोटोत सुष्मिता तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिसत आहे. दोघंही एकत्र योगा करत आहेत. सध्या सुष्मिताचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

 

सुष्मितानं तिच्या इंस्टावरून कहाी फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन हॉट योगा करताना दिसत आहेत. हे फोटो खूपच रोमँटीकदेखील आहेत. सध्या हे फोटो सोशलवर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. सुष्मिताच्या या हॉट योगा फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिचे फिटनेस व्हिडीओज आणि फोटो फोटो चाहत्यांसोबत सोशलवरून शेअर करत असते. यामुळं ती नेहमीच चर्चेत येत असते. त्यामुळं चर्चेत येण्याची सुष्मिताची ही काही पहिलीच वेळ नाही. चाहतेही तिच्या फोटो आणि व्हिडीओची वाट पहात असतात. दीर्घकाळापासून सुष्मिता कोणत्या सिनेमाला घेऊन चर्चेत आलेली नाही. अनेक दिवसांपासून ती कोणत्या सिनेमातही दिसलेली नाही.